Home औरंगाबाद प्राध्यापिकेला ९ लाखांना गंडा, वीज बिल भरला नसल्याचा मेसेज

प्राध्यापिकेला ९ लाखांना गंडा, वीज बिल भरला नसल्याचा मेसेज

Aurangabaad Fraud Crime: बँक खात्यातून काही वेळाच्या अंतराने सातवेळा पैसे वजा झाले. ही रक्कम. नऊ लाख ८९ हजार ८७७ एवढी आहे.

9 lakhs fraud to the professor

औरंगाबाद : चालू महिन्यातील वीज  बिल भरले नसल्यामुळे आपली वीज आज बंद करण्यात येईल, असा बनावट मेसेज निवृत्त प्राध्यापिकेच्या पतीला आला. पतीने हा मेसेज पत्नीला पाठवला. पत्नीने त्या मेसेजमधील नंबरवर संपर्क साधल्यानंतर सायबर भामट्यांनी सांगितल्याप्रमाणे कृती केल्यावर बँक खात्यातील नऊ लाख ८९ हजार ८७७ रुपये गायब झाल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला

निवृत्त प्राध्यापिका नीलिमा मुरुगकर (रा. बी.५, मेरेडिअम स्टेटस, विकॉलनी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती सुभाष लोमटे यांच्या मोबाईलवर २५ जुलै रोजी दुपारी तसा संदेश आला. त्यात संबंधित अधिकाऱ्याशी १६४१०७४८२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याची सूचना होती. त्यानंतर लोमटे यांनी पत्नीला फोन करून तो संदेश पत्नीस पाठविला. मेसेजमधील मोबाईल नंबरवर मुरुगकर यांनी संपर्क साधला. तेव्हा सायबर भामट्याने त्यांना तुमचे वीज बिल भरलेले नाही, असे सांगितले. मुरुगकर यांनी बिल भरल्याचे सांगितले. भामट्याने वीज भरले असले तरी अपग्रेड झालेले नाही, तुम्ही दहा रुपये भरून अपग्रेड करून घ्या, दहा रुपये भरण्यासाठी मी जे सांगतोय ते करा, असे सांगितले. सायबर भामट्याने सांगितल्याप्रमाणे मुरुगकर यांनी प्रक्रिया केली. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून काही वेळाच्या अंतराने सातवेळा पैसे वजा झाले. ही रक्कम. नऊ लाख ८९ हजार ८७७ एवढी आहे.

अनोळखींना माहिती देऊ नका

अनोळखी व्यक्तींना आपल्या बैंक खात्याची माहिती देऊ नये. मोबाईलवर आलेल्या अनोळखी मेसेजला उत्तर देऊ नये. माहिती नसलेले अॅपही मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू नयेत. कोणतीही संस्था, बँक तुम्हाला ऑनलाइन माहिती मागत नाही.

-गौतम पातारे, निरीक्षक, सायबर शाखा

Web Title: 9 lakhs fraud to the professor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here