Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील या तालुक्यात दमदार पाऊस

अहमदनगर जिल्ह्यातील या तालुक्यात दमदार पाऊस

Ahmednagar News:  संगमनेर तालुक्यात रात्री पावसाने चांगलीच सुरुवात केली.

Heavy rain in this taluka of Ahmednagar District

अहमदनगर: दोन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर नगर दक्षिण जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, जामखेड, या तालुक्यांमध्ये गुरूवारी सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. यातील अनेक ठिकाणी दोन तासांपेक्षा अधिक वेळ पाऊस बरसत होता. यंदाच्या पहिल्याच दमदार पावसामुळे बळीराजाच्या मनावरील ताण काही प्रमाणात हलका होणार आहे. दरम्यान नगर शहरात रात्री 9 च्या सुमारास रिमझिम पावसाला सुरूवात झाली असून रात्री उशीरापर्यंत पाऊस कोसळत होता.

गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झालेले असून उत्पादनावर 50 ते 90 टक्के परिणाम होणार आहे. पाऊस नसल्याने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत होती. दुसरीकडे पाण्याअभावी दक्षिण जिल्ह्याच्या पारनेर, कर्जत, जामखेड, पाथर्डी या ठिकाणी तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्यास सुरूवात झाली होती. यामुळे पाण्याच्या टँकरची मागणी वाढली होती. खरीप हंगामातील हातची पिके वाया गेली असली असल्याने शेतकरी हतबल झाला होता.

पावसाचा हा शेवटचा महिना असून गणेशोत्सवात पाऊस न झाल्यास दुष्काळ पडणार अशी स्थिती होती. गणेशोत्सवाचा दुसरा दिवस शेतकर्‍यांसह सर्वांना पावला असून गुरूवारी सायंकाळपासून कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, पारनेर या तालुक्यांतील बहूतांश गावात मेघगजर्नेसह पावसास सुरूवात झाली. सर्वत्र सुमारे दोन तास दमदार पाऊस बरसल्यानंतर रात्री उशिरापर्यंत सर्वत्र रिमझीत सुरू होती. या पावसाने जामखेड तालुक्यात नान्नज परिसरात काही शेतांमध्ये पाणी साचले होते. तसेच पाण्याअभावी जळ लागलेल्या पिकांना यामुळे संजीवनी मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान असले तरी अशाच अधिक दमदार पावसाची शेतकर्‍यांना प्रतिक्षा आहे.

श्रीरामपूर शहर परिसरात रात्री 10.15 वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. राहुरी शहरातही हलका पाऊस सुरू होता. संगमनेर, राहता तालुक्यातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे कपाशी, सोयाबीन, मका या पिकांना जीवदान मिळाले आहे.

Web Title: Heavy rain in this taluka of Ahmednagar

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here