Home अकोले अकोलेत वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पाऊस

अकोलेत वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पाऊस

Akole Heavy Rain:  अकोले तालुक्यात सुमारे दोन तास जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली.

Heavy unseasonal rain accompanied by gale force winds

अकोले: वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शनिवारी दुपारी अकोले तालुक्यात सुमारे दोन तास जोरदार हजेरी लावली. या पावसाने आदिवासी भागात भात पिकाचे मोठे नुकसान झाले. अकोले शहर व परिसरात असणाऱ्या ऊस तोडणी मजुरांच्या झोपड्यांसह काही तळ मजल्यातील गाळ्यांमध्ये पाणी शिरल्याने त्यांची मोठी तारांबळ उडाली. व्यापाऱ्यांच्या गाळ्यात शिरलेले पाणी बाहेर काढण्यासाठी त्रेधा तिरपीट उडाल्याचे चित्र दिसले.

धनत्रयोदशीच्या दिवशी दुपारी अचानक वातावरण ढगाळ बनले. दिवाळीच्या निमित्ताने अमृतसागर दूध संघाने वाटप केलेल्या रिबेट व अगस्ती कारखान्याच्या पेमेंटमुळे ओस पडलेल्या बाजार पेठा फुलून गेल्या होत्या. शहर व तालुक्यातील प्रमुख बाजारपेठांत अबाल वृद्धांनी खरेदीसाठी गर्दी केली होती; मात्र अचानकपणे आलेल्या अवकाळी पावसाने ग्राहकांची धावपळ उडाली. छोटे-मोठे व्यापारी रस्त्यालगत दिवाळीसाठी लागणारे साहित्याचे दुकाने मांडून बसले होते. तसेच शहरातील अगस्ती हायस्कूल येथे उभारण्यात आलेल्या फटाके दुकानदारांचीही फटाके भिजू नये म्हणून एकच धावपळ उडाली.

अगस्ती कारखाना रस्त्याच्या कामासाठी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याने महालक्ष्मी परखतपुर व कारखाना रस्त्याला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. रस्त्यालगत असणाऱ्या तळ मजल्यातील अनेक दुकानात व घरांत पाणी शिरल्याने नागरिकांसोबत व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना शेतीला पाणी भरण्याचा त्रास वाचला, शेतीकामे सुरू असल्याने या अवकाळी पावसाने शेतात पाणीच पाणी साठल्याने शेतीतील भाजीपाला व अन्य पिकांचे नुकसान झाले. आदिवासी भागात भात पीक आदिवासी बांधवांनी कसे बसे वाचवले होते. या अवकाळी पावसाने त्यांच्या तोंडातील घास हिरावल्याने आदिवासी शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाला सामोरे जाण्याची वेळ आल्याने दिवाळी असूनही नेहमीसारखा उत्साह राहिला नाही. अगस्ती करखान्याचा गळीत हंगाम सुरू झाल्याने ऊस तोडणीचे कामाने सध्या वेग घेतला होता; मात्र या अवकाळी पावसाने ऊस तोडणी कामगारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. धुळीने हैराण झालेल्या अकोले व तालुक्यातील नागरिकांना या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला होता.

Web Title: Heavy unseasonal rain accompanied by gale force winds

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here