चहा प्यायला बोलवलं, पोलीस पाटलाला संपवलं
Crime News: कौटुंबिक वादातून पोलीस पाटलाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना.
यवतमाळ : कौटुंबिक वादातून एका पोलीस पाटलाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना यवतमाळच्या कळंब तालुक्यातील खुदानपूर येथे घडली. राजेश नानाजी कोल्हे वय 52 असं मयत पोलीस पाटलाचे नाव आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. विजय रामभाऊ खुडसंगे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी पोलीस सखोल चौकशी करीत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कळंब तालुक्यातील खुदानपूर येथे पोलीस पाटील वास्तव्यास होते. गावातील त्यांच्याच घरासमोर राहणाऱ्या प्रफुल्ल भोयर यांच्यासोबत ते गप्पा मारत उभे होते. त्यांच्याच शेजारी त्यांचे नातेवाईक खुडसंगे कुटुंब राहत आहे. त्यादिवशी विजय खुडसंगे यांनी राजेश कोल्हे यांना चहा पिण्यासाठी घरी बोलावले. राजेश कोल्हे यांना विजय खुडसंगेने कुटुंबातील वादात का पडता असा सवाल विचारला. तसेच विजयने राजेश कोल्हे यांच्यावर त्याच रागातून चाकूने हल्ला देखील केला. या हल्ल्यामध्ये राजेश यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कळंब पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपी विजय खुडसंगे याला अटक करण्यात आली.
Web Title: Murder Called to drink tea, ended the police call
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App