Home अहमदनगर मुली व जावयाच्या मदतीने पत्नीनेच केली पतीची हत्या

मुली व जावयाच्या मदतीने पत्नीनेच केली पतीची हत्या

help of daughters and son-in-law, the wife murder her husband

पाथर्डी | Murder: जमीन वहीवाटीस आडव्या येणाऱ्या पतीचा चक्क पत्नीनेच काटा काढल्याचा प्रकार घडला आहे. पत्नीनेच दोन मुली व एका जावयाच्या मदतीने झाडाला बांधून काठीने व दगडाने बेदम मारहाण करत जीवे ठार मारल्याची घटना पाथर्डी तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. एका जणास अटक करण्यात आली आहे.

तालुक्यातील मयत व्यक्तीला पत्नी, एक मुलगा व तीन मुली असा परिवार आहे. मुलगा भोळसर आहे. १० वर्षापूर्वी पत्नीने पतीला फसवून जमीन स्वतः च्या नावावर केली होती. तेव्हापासून ते दोघे वेगळे राहत होते. मात्र जमीन वहिवाट करण्यास पतीने विरोध केल्याने सोमवारी सायंकाळी मयत व्यक्तीचे मेहुणे हे त्यांच्या घरी गेले असता त्या व्यक्तीला झाडाला बांधून पत्नी, दोन्ही मुली व जावई असे चौघे जण काठीने व दगडाने मारहाण करत दिसले. त्यांनी विरोध केल्याने या सर्वांनी तेथून निघून जाण्यास सांगितले. याबाबत पोलिसांना माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत तो व्यक्ती बेशुद्ध पडला होता. पोलिसांनी त्यास रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. मात्र पत्नीने जमिनीसाठी पतीचा खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.  

Web Title: help of daughters and son-in-law, the wife murder her husband

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here