Home अहमदनगर मोठा खुलासा: या कारणामुळे डॉक्टरने केली लसीकरण केंद्रातच आत्महत्या

मोठा खुलासा: या कारणामुळे डॉक्टरने केली लसीकरण केंद्रातच आत्महत्या

Ahmednagar News doctor committed suicide at the vaccination center

पाथर्डी | Ahmednagar News: पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील आरोग्य उपकेंद्रावर लसीकरण सुरु असताना डॉक्टरने आत्महत्या केली. उप केंद्रात आरोग्य अधिकारी डॉ. गणेश शेळके रा. बहिरवाडी ता, नेवासा यांनी गळफास घेत आत्महत्या केली.

डॉ. गणेश शेळके करंजी आरोग्य उपकेंद्रात समुदाय अधिकारी म्हणून कार्यरत होते. आज सकाळपासून करंजी आरोग्य उपकेंद्रात करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होते. दुपारी डॉ. शेळके यांनी तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांकडे कागद व पेन मागितला. त्यानंतर त्यांनी केबिनचा दरवाजा बंद करून घेतला. बराच वेळ झाला तरी दरवाजा उघडला नाही, त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी डॉ. शेळके यांना आवाज दिला. मात्र, आतून प्रतिसाद आला नाही. त्यामुळे उपस्थित कर्मचारी घाबरले. त्यांनी दरवाजा तोडला असता आतमध्ये डॉ. शेळके यांनी पंख्याला गळफास लावून घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक वाघ हे घटनास्थळी दाखल झाले.

वाचा: लसीकरण सुरु असताना कार्यालयात आरोग्य अधिकाऱ्याने घेतला गळफास

याबाबत पोलिसांना सुसाईड नोट आढळून आली आहे यामध्ये म्हटले आहे की,  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत दराडे, तहसीलदार, जिल्हाधिकारी व प्रशासनाच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करीत आहोत. वेळेवर पगार न मिळणे, अतिरिक्त कामाचा भार, असा त्रास होत असल्याचे डॉ. शेळके यांनी चिठ्ठीत म्हटले आहे.

Web Title: Ahmednagar News doctor committed suicide at the vaccination center

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here