खा. सुजय विखे रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीप्रकरण पोलीस चौकशीचे हायकोर्टाचे आदेश
अहमदनगर: नगरचे खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe)यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीप्रकरणी पोलिसांनी चौकशी करून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी असा आदेश दिला आहे.
तसेच विखे यांनी बाजू मांडण्याचा प्रतिवादी अर्जही त्यांना मागे घ्यावा लागला आहे. याप्रकरणातील विखे आणि प्रशासन यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रातून वस्तूस्थितीबद्दल एकमत होत नाही. त्यामुळे पोलिसांनीच याची चौकशी करावी असा आदेश न्यायालयाने दिला आहे.
खासदार विखे यांनी दिल्लीहून रेमडेसिवीर इंजेक्शन आणून नगर जिल्ह्यात वाटप केल्याचा व्हिडियो प्रसारित केला होता. यावरून सामाजिक कार्यकर्ते अरुण कडू, एकनाथ घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी ही याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती आर. व्ही. घुगे व बी. यु. देबडवार यांच्यासमोर यावर सुनावणी झाली.
या प्रकरणातील याचिकाकर्ते, पोलीस, जिल्हाधिकारी व डॉ. विखे यांनी सादर केलेल्या कागदपत्रांतून वस्तुस्थितीबद्दल एकमत होत नाही. वस्तुस्तिथी तपासण्याचे व चौकशी करण्याचे काम न्यायालयाचे नसून तपास अधिकाऱ्याचे आहे. त्यामुळे ते काम पोलिसांनी करावे असे न्यायालयाने म्हंटले आहे.
Web Title: High Court orders Sujay Vikhe police inquiry