Home अहमदनगर राष्ट्रवादीच्या आमदाराचा कोविड सेंटरमध्ये मुक्काम, रुग्णांना देताय अहोरात्र सेवा

राष्ट्रवादीच्या आमदाराचा कोविड सेंटरमध्ये मुक्काम, रुग्णांना देताय अहोरात्र सेवा

NCP MLA Nilesh Lanke stays at Covid Center

पारनेर: पारनेर मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे सध्या सोशियल मेडीयात चर्चेचे विषय ठरलेले आहे. राज्यात कोरोनाची संख्या वाढत असताना बरेचसे आमदार आपापल्यापरीने कोविड सेंटर उभारून रुग्णांना सहकार्य सहकार्य व मदत करीत आहे.

असेच पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके हे रुग्णांच्या रात्रंदिवस सेवा करण्यासाठी कोविड सेंटरमध्येच मुक्काम करीत आहे.

बाधित रुग्णांची आस्थेने विचारपूस करून त्यांची व त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्याचे काम ते करत आहे. दुसऱ्या कोरोना लाटेत त्यांनी भाळवणी येथे ११०० बेडचे सुसज्ज कोविड सेंटर उभारले आहे. कोरोनाकाळात काही जण घरात बसून आहेत तर काही जण रस्त्यावर उतरून लोकांची मदत करीत आहे. त्यामधील निलेश लंके एक आहेत.

निलेश लंके हे कोविड सेंटरमध्येच जेवण व आणि मुकाकाम तेथेच करून जनसेवा करीत आहे. एखाद्या रुग्णाला ऑक्सिजन व औषधांची गरज लागल्यास ते तेथेच उपलब्ध राहून रुग्णांना मदत करत आहे. कोविड सेंटरमध्येच झोपलेले हा फोटो सोशियल मेडीयात चांगलाच व्हायरल होत आहे. ते आपल्या स्वतःच्या लोकांसाठी काम करीत आहे ते रुग्णांची ऑक्सिजन लेवल, तपासणी, ताप रुग्णांची विचारपूस करीत असताना ते दिसत आहे.

कोव्हीड सेंटरमध्ये जेवणासाठी मांसाहार, अंडी, पालेभाज्या तसेच फळे, शुद्ध पाणी देण्यात येते. हजारो रुग्ण या सेंटरमधून बरे होऊन गेले आहे.

आमदार निलेश लंके: “आपलं काय व्हायचं ते होऊ द्या” जर मी घरात बसलो तर लोकांनी कोणाच्या दारात बसायचं. माझी लोक सुरक्षित असली पाहिजेत यासाठी कोरोनाबाधितांच्या सेवेत झटत आहे. लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असून तो त्यांचा कुटुंबप्रमुखही असतो अशी भावना लंके यांनी व्यक्त केली.   

Web Title: NCP MLA Nilesh Lanke stays at Covid Center

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here