Home महाराष्ट्र Anil Deshmukh Resigned: अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

Anil Deshmukh Resigned: अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

Home Minister Anil Deshmukh Resigned Finally

Anil Deshmukh Resigned:  माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे आरोप लावले होते या आरोपावरून अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

याप्रकरणी अॅड, जयश्री पाटील यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर हायकोर्टाने सुनावणी देत प्रकरणावर सीबीआयला १५ दिवसांत प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीवर नामुष्की ओढवली आहे. स्वतः अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्याचे ट्वीट करून सांगितले आहे.

मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर विरोधी पक्ष भाजापाने पुन्हा एकदा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणो केली होती. अनिल देशमुख यांच्यावर सीबीआय चौकशी लागल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. त्यांनी ट्वीट करून राजीनाम्याचे पत्रही शेअर केले आहे.

Web Title: Home Minister Anil Deshmukh Resigned Finally

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here