Home अहमदनगर शेतकऱ्यांना कोट्यावधीचा चुना लावणाऱ्या व्यापाऱ्याला अटक

शेतकऱ्यांना कोट्यावधीचा चुना लावणाऱ्या व्यापाऱ्याला अटक

Shrirampur Trader arrested for smuggling lime to farmers 

श्रीरामपूर: शेतकऱ्यांना कोट्यावधीचा  चुना लावून फरार झालेल्या व्यापारी मुथा प्रकरणातील दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीचा भाऊ गणेश रामलाल मुथा व त्याची पत्नी आशा गणेश मुथा यांना जळगाव येथून अटक केली आहे.

त्यांच्याकडून पोलिसांनी एक दुचाकी व ५० हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव, मुठेवाडगाव, खानापूर, भामाठान यांसह परिसरातील अनेक शेतकऱ्यांना भुसार माल खरेदी करून कोट्यावधी रुपयांना गंडा घालून माळवाडगाव येथील व्यापारी रमेश मुथा हा आपल्या कुटुंबियासह ६ फेब्रुवारीपासून पसार झाल्याची घटना घडली होती. याबाबत ९ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र याबाबत अत्यंत संथ गतीने तपास सुरु होता त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, डीवायएसपी संदीप मिटके यांनी जातीने लक्ष घालून १९ दिवसांनतर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या पथकाने जळगाव येथून या प्रकरणातील दोघांना अटक केली आहे.   

Web Title: Shrirampur Trader arrested for smuggling lime to farmers 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here