Home अकोले अकोलेतील हनीट्रॅप: सोशियल मेडियातून अकोलेतील शेतकरी संगमनेर महिलांच्या जाळ्यात

अकोलेतील हनीट्रॅप: सोशियल मेडियातून अकोलेतील शेतकरी संगमनेर महिलांच्या जाळ्यात

Honey Trap social media to the net of farmer women in Akole  

संगमनेर | Honey Trap: सोशियल मेडीयाद्वारे अकोले तालुक्यातील एका शेतकऱ्याची संगमनेरातील एका महिलेशी ओळख होऊन, महिलेने शेतकऱ्याशी ओळख वाढवून त्याला धमकी देत ५० हजार रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी सदर महिला व तिच्या दोन साथीदार महिला अशा तीन महिलांविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

दोन महिन्यापूर्वी अकोले तालुक्यातील एका ४६ वर्षीय शेतकऱ्याची संगमनेरमधील एका महिलेशी सोशियल ,माध्यमातून ओळख झाली होती. या महिलेने शेतकऱ्याचा मोबाईल नंबर मिळवत त्याला मेसेज पाठविले. शेतकऱ्याने २६ मे ला नवीन चार चाकी वाहन खरेदी केल्यानंतर फोटो त्याने सामाजिक माध्यमात टाकले. पेढे कधी देणार असे तिने विचारल्यावर संगमनेरला आल्यावर देतो असे तो म्हणाला.

दिनांक ६ जून रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास शेतकरी संगमनेरमध्ये आला होता. त्यावेळी त्याच्या मोबाईलवर ओळख झालेल्या महिलेचा फोन आला. त्यानंतर एक तासानंतर ही महिला व शेतकरी एकमेकांस भेटले. त्यावेळी तिच्यासोबत दोन महिला होत्या.

चहा पाजण्याच्या कारणाने ओळख झालेली महिला या शेतकऱ्याला उपनगरात राहणाऱ्या तिच्या मावशीच्या खोलीवर घेऊन गेली. खोलीत गेल्यानंतर पडदा लावून घेतला असता शेतकऱ्याला संशय आल्याने तो बाहेर जाण्यास निघाला. त्यावेळी तिने त्याचा मोबाईल हिसकावून घेत शिवीगाळ केली. त्याच्या त्याच्या खिशातील एक हजार बळजबरीने काढून घेतले. त्याच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी करत पैसे न दिल्यास विनयभंगाचा गुन्हा दाखल क्कारण्याची धमकी दिली.

शेतकऱ्याने तेथून त्याची सुटका करत मोबाईल व हजार रुपये सोडून लांब जाऊन उभा राहिला. या महिला त्याला पुन्हा दिसल्या असता चार चाकी वाहनातून त्याने त्यांचा पाठलाग करत कसारा दुमाला शिवारातील पुलाजवळ त्यांना गाठत त्याचा मोबाईल व पैसे मागितले. त्यावेळी या महिलांनी कोणाला तरी बोलावून घेतले.

त्यांनतर तेथे चार चाकी आली व शेतकऱ्यास मारहाण केली. जमाव झाल्यानंतर हा माणूस आमची छेड काढतो असे त्या लोकांना सांगत होत्या. त्यानंतर त्या महिला तेथून निघून गेल्या.

Web Title: Honey Trap social media to the net of farmer women in Akole  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here