Home अहमदनगर महावितरण अभियंत्यास कार्यालयात जाऊन धक्काबुक्की

महावितरण अभियंत्यास कार्यालयात जाऊन धक्काबुक्की

Pushing the MSEDCL engineer to the office crime Filed

अहमदनगर | Crime: महावितरण कार्यालयात येऊन सहायक अभियंत्यास धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात १० ते १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी स्वप्नील संजयराव उल्हे वय ३२ सहायक अभियंता, गंजबाजार कक्ष महावितरण यांनी फिर्याद दाखल केली आहे.

१४ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अभियंता उल्हे हे गंजबाजार कार्यालयात असताना तेथे आरोपी सुलतान दुलेखान शेख रा. जुना बाजार हा आला. तुमच्या ऑफिसचे कर्मचारी वीज बिल वसुलीसाठी आमच्या घरी आले व त्यांनी तेथे वाद घातला असे म्हणत उल्हे यांच्याशी हुज्जत घातली. उल्हे यांनी आमच्या वरिष्ठांशी बोला असे म्हणताच आरोपी तेथून निघून गेला आणि काही वेळाने पुन्हा १० ते १५ जण घेऊन आला. उल्हे यांना शिवीगाळ करीत त्यांच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की केली असे फिर्याद नोंदविण्यात आली असून यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Web Title: Pushing the MSEDCL engineer to the office crime Filed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here