Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: बोलेरो व दुचाकीत भीषण अपघात- Accident

अहमदनगर ब्रेकिंग: बोलेरो व दुचाकीत भीषण अपघात- Accident

Ahmednagar | rahuri Accident:  नगर मनमाड रोडवर बोलेरो व दुचाकीत भीषण अपघात झाल्याने तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना.

Horrible accident in Bolero and two-wheeler

राहुरी: राहुरी कृषि विद्यापीठ पेट्रोलपंपाशेजारी नगर-मनमाड महामार्गावर बोलेरो व दुचाकी यांच्या भिषण अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. आज दुपारी हा अपघात झाला.

बालकदास महाराज गोलवाले मुळ झाशी येथील असून सध्या तीन महिन्यापासून ते राहुरी तालुक्यातील मांजरी येथील चंद्रगीरी देवस्थान येथे वास्तव्यास होते. ते नगरहून राहुरीकडे येत असताना विद्यापीठाच्या पेट्रोलपंपाकडे पेट्रोल भरण्यास वळाले असता अचानक राहुरीकडून नगरकडे भरधाव वेगाने जाणार्‍या बोलेरो गाडीने त्यांच्या दुचाकीला उडवले.

त्यानंतर बोलेरो गाडी ने पलट्या खाऊन बोलेरो गाडी शेजारील साईडगटारात पडली. या भिषण अपघातात बालकदास महाराज गोलवाले व बोलेरो मधील दोन जण गंभिर जखमी झाले. त्यांना रूग्णवाहिकेतून नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये महाराजांची परीस्थीती चिंताजनक असल्याचे समजते.

Web Title: Horrible accident in Bolero and two-wheeler

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here