Home क्राईम विकृतीचा कळस: ऐन दिवाळीत चिमुकलीवर अत्याचार

विकृतीचा कळस: ऐन दिवाळीत चिमुकलीवर अत्याचार

Pune Crime News:   13 महिन्याच्या चिमुकलीवर अत्याचार (abuse) करण्यात झाला असून आरोपीला पोलिसांनी अटक (Arrested) केली.

Ain Diwali abuse of a child girl

पुणे:  विकृतपणाचा कळस गाठ आणि प्रत्येकाच्या मनात सत्ताप निर्माण होईल अशी संतापजनक घटना पुण्यातून समोर आली आहे

पुण्याच्या वारजे माळवाडी भागात तेरा महिन्याच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात झाला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली

ओळखीतल्या व्यक्तीनेच हे संताप आणणारे कृत्य केले आहे. पोलिसांकडील माहितीनुसार वारजे माळवाडी परिसरात मजुरी करणारे दापत्य राहते.

या दांपत्याला एक तेरा महिन्याची चिमुकली आहे. चिमुकलीचे आई- वडील काही कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी आरोपीने, तुम्ही येईपर्यंत मी चिमुकलीचा सांभाळ करतो. तुम्ही बिनधास्त जा, असे सांगत चिमुकलेला आपल्या कडेवर उचलून घेतले.

संबंधित व्यक्ती ही विश्वासातील आणि ओळखीचे असल्याने तो आपल्या चिमुकलीचा सांभाळ करेल, असा विश्वास या दांपत्याला वाटल्याने त्यांनी चिमुकलेला त्याच्याकडे सोपविले. आणि ते आपल्या कामासाठी बाहेर निघून गेले.

या विश्वासाचा गैरफायदा घेत या विकृताने चिमुकलीवर अत्याचार केले. घरी आलेल्या दांपत्याला आपली चिमुकली रडत असल्याने तिला तात्काळ रुग्णालयात नेले असता हा प्रकार समोर आला,

त्यानंतर संबंधित व्यक्ती विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात अत्याचार आणि पोस्को कायद्याद्वारे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Ain Diwali abuse of a child girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here