अहमदनगर: दोन महिलांनी सराफाला घातला गंडा
Ahmednagar | Kopargaon theft: दुकानात येऊन सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण लंपास केल्याची घटना.
कोपरगाव: दोन अनोळखी महिलांनी शहरातील प्रतिष्ठित सराफ संजय शंकर भडकवाडे वय ४९ रा. सुभद्रानगर यांच्या दुकानात येऊन सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण लंपास केल्याची घटना घडली आहे.
कोपरगावातील तुळजाभवानी मंदिरानजिक असलेल्या आत्मा मलिक नावाच्या सराफ दुकानात रविवारी (दि. २३) सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सराफ दुकानात दोन महिला आल्या व त्यांनी, आपल्या सोन्याचे गंठन घ्यावयाचे आहे, अशी बतावणी करून सराफ दुकानात प्रवेश केला. सोन्याचे पॅडल दाखवा, पोत दाखवा, पळ्या दाखवा, असे म्हणून त्यांनी दुकानदारास गुंतवून ठेवले व त्यांचे लक्ष इतरत्र गेल्याची संधी साधत दाखवलेल्या मालातून एक तोळ्याचे सोन्याचे गंठन हातोहात लंपास केले.
महिला आपले उद्दिष्ट साध्य झाल्यावर त्या ठिकाणाहून निघून गेल्या. त्यानंतर दुकानदाराने आपले डाग मोजून पहिले असता त्यात त्यांना आपले १८ कॅरेटचे १० ग्रॅम वजनाचे एक ५० हजाराचे सोन्याचे गंठण आढळले नाही. त्यावेळी त्यांनी शोधाशोध करून पाहिले असता त्यांना ते सापडले नाही. अखेर त्यांनी आपल्या दुकानातून या महिलांनी ते लंपास केला असल्याची खात्री झाल्यावर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
येथील तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. चोरीचा प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यावरून चोरी झाल्याची खात्री पोलिसांना पटली असून याप्रकरणी अज्ञात दोन चोरट्या महिलांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक संजय पवार हे करीत आहेत.
Web Title: Sarafa was beaten by two women theft