Home क्राईम Murder: मुलाने वडिलांना भरपूर दारू पाजून फरशी डोक्यात घालून केला खून

Murder: मुलाने वडिलांना भरपूर दारू पाजून फरशी डोक्यात घालून केला खून

Murder Case:  मुलाने वडिलांच्या डोक्यात फरशी घालून केला खून.

son Murder his father by drinking a lot of alcohol and putting a floor on his head

सोलापूर:  दारू पिऊन आईसह कुटुंबातील इतर सदस्यांना त्रास देत असणाऱ्या वडिलांच्या डोक्यात फरशी घालून मुलानेच खून केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. रविवारी मध्यरात्री एमआयडीसी परिसरातील किर्ती नगरात ही घटना घडली. आकाश गवंडी असं खून करणाऱ्या मुलाचं नाव आहे.

हत्येच्या अवघ्या काही तासातच पोलिसांनी तपास करीत त्याला सोलापूर रेल्वे स्टेशन वरून ताब्यात घेतले. आज त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. संशयित आरोपी आकाश आणि त्याचे वडील बसवराज गवंडी हे दोघेही ठेकेदाराकडे मिस्त्री म्हणून कामाला जात असत. मयत बसवराज यांना दारूचे व्यसन होते. तर मुलगा आकाश हा देखील मद्यपान करायचा.

रविवारी २३ ऑक्टोबर रोजी घरी दोघेच होते. आकाशने त्याच्या वडिलांना भरपूर दारु प्यायला दिली. घरी रात्री जेवण करून झोपल्यानंतर घरामध्ये कोणीही नाहीये हे लक्षात येताच आकाशने वडिलांच्या डोक्यात फरशी घातली आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. वडिलांचा खून करून रात्रभर मृतदेहाच्या बाजूला झोपला.त्यानंतर मात्र तो सोलापूर सोडण्याच्या बेतात असतानाच पोलिसांनी त्याला रेल्वे स्टेशन परिसरातून तात्काळ अटक केली आहे.

Web Title: son Murder his father by drinking a lot of alcohol and putting a floor on his head

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here