रुग्णालयातील वार्डबॉयनेच केला रेमडेसिवीरचा काळाबाजार
श्रीरामपूर: श्रीरामपूर येथील रेमडेसिवीरचाकाळाबाजारप्रकरणी रुग्णालयातील वार्डबॉय व मेडिकल दुकानातील कामगार यांनीच गुन्हा केल्याचे शहर पोलिसांनी सांगितले आहे. या गुन्हातील चार जणांना अटक केलेल्या आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
शहरामधील एका गरजू रुग्णाच्या कुटुंबियांना चार हजार ८०० रुपयांच्या दोन रेमडेसिवीरची किमत २० हजार दराने ते विक्री करत होते. त्याचवेळी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. संजय रूपटक्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुभम श्रीराम जाधव रा. आंबेजोगाई, प्रवीण प्रदीप खुणे रा. बार्शी, दिनेश संजय बनसोडे यांना पोलिसांनी अटक केली होती. यातील जाधव व खुणे हे एका रुग्णालयात वार्ड बॉय होते तर बनसोडे हा मेडिकल दुकानात कामगार होता. हे एका महाविद्यालयातील विद्यार्थी आहेत.
वार्ड बॉय आणि मेडिकल कामगार यांनी बाजारात विक्रीचा प्रयत्न केला अत्री मुळात हे इंजेक्शन कोणी मागविले होते हे मात्र समजू शकले नाही. या गुन्ह्यातील इंजेक्शन कोणी मागितले होते याबाबत पोलिसांनी खुलासा केलेला नाही.
Web Title: Hospital’s wardboy blackmailed Remdesivir