Home अहमदनगर रेमडेसिवीर वाटप प्रकरणी खा. डॉ. सुजय विखे यांच्या अडचणीत वाढ

रेमडेसिवीर वाटप प्रकरणी खा. डॉ. सुजय विखे यांच्या अडचणीत वाढ

Sujay Vikhe difficulty increases

अहमदनगर: खा. डॉ. सुजय विखे यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा आणून तो वाटप केल्या प्रकरणी त्यांच्या अडचणीत वाढ निर्माण झाली आहे. इंजेक्शन आणून वाटप केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली आहे.

विखे यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन आणून जिल्हा रुग्णालय, शिर्डीच्या साईबाबा रुग्णालयात त्यांचे वाटप केले आहे/ एवढा मोठा इंजेक्शनचा सतः विखे यांनी कसा व कोठून आणला तसेच ते कोणाला वाटप केला याबाबत अरुण कडू, चंद्रभान घोगरे, लोणी येथील बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी औरंगाबाद खंडपिठात वकील सतीश तळेकर यांच्यामार्फत फौजदारी याचिका दाखल केली  आहे.

सदर साठा प्रशासनाने तत्काळ जप्त करण्यात यावा व गरजू रुग्णांना जिल्हाधिकाऱ्यामार्फत समन्यायी वाटप करावे अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. न्यायमूर्ती आर. व्ही. घुगे व बी.यु.देबडवार यांच्यासमोर सोमवारी सुनावणी झाली. न्यायालयाने पुढील सुनावणी २९ एप्रिलला ठेवली असल्याचे वकील डी. आर काळे यांनी सांगितले.

Web Title: Sujay Vikhe difficulty increases

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here