Home लाइफस्टाइल या चार मार्गांनी वाढवा कामाची वेळ आणि उर्जा: Positive Energy

या चार मार्गांनी वाढवा कामाची वेळ आणि उर्जा: Positive Energy

How to develop positive energy Marathi motivational blog

How to develop positive energy  Marathi motivational blog

आपली वेळ आणि ऊर्जा विभागणीसाठी हे चार मार्ग अवलंबू शकता. आधुनिक जीवनात मनुष्याकडे इतका वेळ नाही की तो स्वत:चे काम स्वतः करू शकेल, मग तो कितीही कुशल असो. जर प्रत्येक कामाची आपण विभागणी सुरू केली करताना जास्त अवघड जाणार नाही. यशोशिखरावर पोहोचण्यासाठी वेळ आणि ऊर्जा हे महत्त्वाचे घटक मानले जातात. यांचा सदुपयोग गरजेचा आहे. त्यांची विभागणीसाठी या चार सोप्या पद्धतींचा अवलंब करता येऊ शकतो.

१) वेळ वाया घालवायचा नाही हे निश्चित करा:

जेव्हा तुम्हाला हे माहीत असते की, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी एखादे काम करू शकणार नाही, तेव्हा अनावश्यक तणावाने आणि कमीपणाच्या जाणिवेने तुम्ही स्वतःला बऱ्याच प्रमाणात तणावमुक्त करू शकता. व्यावसायिक आघाड्यांवरही तुम्ही अनावश्यक समित्यांपासूनही अंतर राखता आणि व्यक्तिगत स्तरावर असेही होऊ शकते की, तुम्ही बागकाम किंवा घरगुती कामासाठी कामासाठी कुणाला तर ठेवू शकता.

२) वेळ वाटण्याची रणनीती बनवा:

कामावर असताना व्यक्तिगतरीत्या तुम्ही तुमच्या मर्यादा ठरवू शकता. कोणत्या वेळी कोणते काम करावे किंवा करू नये, हे निश्चित करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कधी आणि किती वेळेची यासाठी गुंतवणूक करावी. सलग काम न करण्याचे एक मोठे कारण असू शकते की तुमच्याकडे व्यायाम, झोप आणि कुटुंब राहण्यासाठी वेळच राहात नाही.

३) काही कामांसाठी नियमितपणे वेळ काढा

तुमचे रोजचे आणि आठवड्याचे नियोजन असे हवे की, प्रत्येक खास गोष्टीसाठी थोडा तरी वेळ काढता यावा आणि तेही सहजगत्या व्हावे. आठवड्यातून किमान दोनवेळा स्वतःशीही भेट करा. महत्त्वाच्या प्रोजेक्ट्सना पुढे नेण्यासाठी काही वेळ काढा. जवळपास कोणत्या तरी फिटनेस कॅम्पमध्ये सहभागी होऊ शकता. आठवड्यातून कमीतकमी तीनवेळा व्यायाम करत स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकाल.

४) संतुलन ठेवतच लक्ष्याकडे वाटचाल करा:

ज्या बिनकामाच्या गोष्टींसाठी तुम्ही गरजेपेक्षा जास्त वेळ देत आहात, जसे की अॅडमिनिस्ट्रेटिव पेपर वर्क किंवा ॲरेंड्स, यांच्यासाठीचा काही वेळ कमी केला जाऊ शकतो किंवा यासाठी कुणाला तरी ठेवता येऊ शकते. जेणकरून तुम्ही अशा कामांसाठी ठरावीक वेळ देऊ शकता, जो गरजेचे आहे. फायद्याचेही आहे आणि जे केवळ तुम्हीच करू शकता. जसे, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग किंवा कुटुंबासह वेळ घालवणे.

Web Title: How to develop positive energy  Marathi motivational blog

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here