Home Accident News Accident: स्विफ्ट कार आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ६ ठार

Accident: स्विफ्ट कार आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ६ ठार

Beed Accident News: गाडीमधील व्यक्तींचा अक्षरशः चेंदामेंदा झाला इतका भीषण अपघात घडला.

accident between Swift car and Eicher Tempo, 6 killed in same family

बीड: स्विफ्ट कार आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील  जण ठार झाले आहेत. बीडच्या पाटोदा मांजरसुंबा रोडवरील पाटोद्याजवळ बामदळे वस्ती येथे हा अपघात घडला. घटनास्थळी पोलीस दाखल होताच व्यक्तींना बाहेर काढण्यात आले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कुटे कुटुंबिय हे पुणे येथून आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथे जात होते. मात्र, पाटोदा शहराजवळील बामदळे वस्ती येथे सकाळी सात वाजेच्या सुमारार आयशर टेम्पो आणि त्यांच्या स्विफ्ट कारचा अपघात झाला. अपघातात टेम्पो थेट कारच्यावर चढल्याने कार पुर्णपणे दाबली गेली. हा अपघात एवढा भीषण होता, की आयशर टेम्पोच्या खाली स्विफ्ट कार घुसल्याने आणि कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. यामुळे कारमध्ये बसलेल्या कुटे कुंटुंबियातील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

टेम्पोखाली अडकलेली स्विफ्ट कार काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. गाडीमधील व्यक्तींचा अक्षरशः शरीराचा चंदामेंदा झालेला होता. घटनास्थळी पाटोदा शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस हजर झाले होते, या सर्वांनी मिळून गाडीबाहेर मृतदेह काढण्यास मदत केली. या अपघाताचा अधिक तपास केला जात आहे.

Web Title: accident between Swift car and Eicher Tempo, 6 killed in same family

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here