Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: एचपी गॅसचा टँकर उलटल्याने अपघात

अहमदनगर ब्रेकिंग: एचपी गॅसचा टँकर उलटल्याने अपघात

Ahmednagar | Nevasa tankar Accident: महामार्गावर एचपी टँकर उलटल्याने अपघात झाल्याची दुर्घटना.

HP Gas Tanker Overturned Accident

नेवासा: तालुक्यातील माळी चिंचोरा फाटा येथे नगर संभाजीनगर महामार्गावर एचपी टँकर उलटल्याने अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातात कोणतीही हानी झाली नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, रविवार दि.२३ ऑक्टोबर रोजी सकाळी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा १७ टन गॅस भरून चाकण वरून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या एमएच ४३ बीजी २३९४ क्रमांकाचा टँकरला भरधाव वेगातील ट्रॅव्हलरने कट मारल्याने ट्रॅव्हलर बसला वाचविण्याच्या प्रयत्नात गॅसचा टँकर रस्त्याचे खाली शेतातील पिकात जाऊन पलटी झाला.

सुदैवाने टँकरमधून गॅस गळती झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र यात टँकरचे नुकसान झाले. टँकरचा चालक बचावला असून सुखरूप आहे.. क्रेनच्या सहाय्याने टँकर व टँकर वरील गॅसची टाकी उभे करण्याचे काम सुरू होते.

Web Title: HP Gas Tanker Overturned Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here