संगमनेर: दिवाळीसाठी गावी येणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू- Accident
Sangamner Accident: खड्ड्यांमुळे अपघातात तरुणाचा झाला मृत्यू.
संगमनेर: दिवाळी सणासाठी पुणे येथून संगमनेर तालुक्यातील आमलेवाडी येथील आपल्या घरी येणाऱ्या तरूणाचे दुचाकी अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
हा अपघात नाशिक-पुणे महामार्गावर बोटा बायपास जवळ शनिवारी (२२ ऑक्टोबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. सागर भाऊसाहेब आमले (वय-२६) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील आमलेवाडी येथील सागर आमले हा तरुण चाकण येथे नोकरीला होता. शनिवारी दिवाळी निमित्त मूळगावी येत असताना बोटा बायपास येथे मोठ्या प्रमाणात पाडलेल्या खड्याच्या अंदाज न आल्याने खड्यात दुचाकी आदळून त्याचा अपघात झाला.
अपघात इतका भयानक होता की त्याच्या डोक्यात हेल्मेट असूनही डोक्याला गंभीर विजा झाली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास घारगाव पोलीस करत आहे.
Web Title: young man who was coming to his village for Diwali died in an accident