Home महाराष्ट्र बारावी ऑनलाईन परिक्षेवर बहिष्कार, आ. सत्यजित तांबे म्हणाले….

बारावी ऑनलाईन परिक्षेवर बहिष्कार, आ. सत्यजित तांबे म्हणाले….

HSC online Examination Boycott: माहिती तंत्रज्ञान कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचा इशारा.

HSC online Examination Boycott Satyajeet Tambe said

संगमनेर: महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन माहिती तंत्रज्ञान शिक्षक संघटनेच्या मागण्या मान्य न केल्यास फेब्रुवारी-मार्चमध्ये तंत्रज्ञान विषयाच्या ऑनलाईन परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा माहिती तंत्रज्ञान कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अतुल पाटील यांनी दिला आहे. संगमनेर तालुक्यात माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षकांनी पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांची भेट घेऊन याबाबत त्यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी तांबे म्हणाले अतिशय गांभीर्याने या प्रश्नाकडे लक्ष घातले आहे, यासाठी आपण सर्वोतपरी प्रयत्न करणार असून आपल्या स्तरावरून मा. मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना पत्र देऊन पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

इयत्ता बारावीसाठी माहिती तंत्रज्ञान हा विषय आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स या तीनही शाखांना शिकवला जातो. या विषयाची परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत ऑनलाइन पद्धतीने घेतली जाते. ही परीक्षा दि २३, २४ व २५ मार्च २०२३ रोजी घेतली जाणार आहे. ही परीक्षा पार पाडण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षक हे तांत्रिक सहाय्यक अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. अशा या अत्यंत महत्त्वाच्या विषयाबाबत शासनाने अनुकूल भूमिका घेऊनही निर्णय होत नाही. माहिती व आहे. तंत्रज्ञान विषय शिक्षक गेल्या २० वर्षांपासून त्यांच्या हक्काचे वेतन प्राप्त करण्यासाठी झटत आहेत.

उच्च माध्यमिक स्तरावरील माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षकांना वेतनापोटी अनुदानाची तरतूद करण्याबाबत शासनाची माहिती संकलन प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानुसार राज्यात ५९७ शिक्षक २१ वर्षांपासून सेवेत आहेत. त्यांच्या वेतनापेटी सुमारे १० कोटी खर्च येणार आहे. हा प्रस्ताव अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या शिक्षकांना वेतन अनुदान मिळावे, त्यांची सन २००१-०२ पासूनची सेवा ग्राह्य धरण्यात यावी, आदी मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा मार्चमध्ये होणाऱ्या १२ वी ऑनलाईन परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

राज्यातील सर्व ९ विभागांतील अंदाजे २ हजार पेक्षा अधिक माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील अंदाजे १ लाख ६० हजार विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान विषयाच्या ऑनलाइन परीक्षा देताना असुविधेचा सामना करावा लागेल. यास सर्वस्वी शिक्षण विभाग व सरकार जबाबदार असेल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष अतुल पाटील, विशाल शिंदे, नितीन राऊळवार, नंदू जाधव, संजय पवार, प्रशांत भावसार, बी.टी. दिघे व पदाधिकारी यांनी दिला आहे.

दरम्यान माहिती तंत्रज्ञान कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने मा. मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना बहिष्कारबाबत ऑनलाईन निवेदन देण्यात आले आहे तसेच प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयातील आय टी शिक्षक प्राचार्यांना निवेदन देऊन ऑनलाईन परीक्षा बहिष्कारावर ठाम आहेत.  

Web Title: HSC online Examination Boycott Satyajeet Tambe said

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here