HSC SSC Examination Update: विद्यार्थी हित लक्षात घेवून व पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर वाढवून देण्यात येत आहे.
पुणे: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ. १२ वी व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी परीक्षेस प्रविष्ट होणा-या परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी (आकलन होण्यासाठी) परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते.
इ. १० १२वी च्या परीक्षा विद्याथ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाज पटक यांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही अशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत. अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ पासून रद्द करण्यात येत असल्याचे कळविण्यात आलेले आहे. तथापि विद्यार्थी हित लक्षात घेवून व पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर वाढवून देण्यात येत आहे. फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून सकाळ सत्रात स. ११.०० वाजता तसेच दुसरे सत्रात दु. ३.०० वाजता परीक्षा प्रश्नपत्रिका वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल. १०.३० वाजता तसेच दुपार सत्रात २.३० वाजता परीक्षाव्यनि परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
उदा:- परीक्षेची सध्याची वेळ
परीक्षेची सुधारित वेळ
स. ११.०० ते दु. २.०० स. ११.०० ते दु. २.१०
सकाळ सत्र
स. ११.०० ते दु. १.०० स. १२.०० १.१०
स. ११.०० ते दु. १.३० म. ११.०० ते दु. १.४०
दु. ३.०० ते सायं. ६.०० दु. ३.०० ते सायं. ६.१०
Web Title: HSC SSC Examination Update Incresed ten minutes
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App