Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: अन्न व औषध प्रशासन कार्यालयास आग

अहमदनगर ब्रेकिंग: अन्न व औषध प्रशासन कार्यालयास आग

Ahmednagar News:  अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयास आग (Fire) लागल्याची घटना, फर्निचर जळून खाक.

Ahmednagar Food and Drug Administration office fire

अहमदनगर:  सावेडी नाका येथे अन्न व औषध प्रशासनाचे खासगी जागेत कार्यालय आहे.  सावेडी नाका परिसरात असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयास आग लागल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.  ही आग शॉर्टसर्किटने लागली असल्याचे उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली. बुधवारी नेहमीप्रमाणे कार्यालयीन कामकाज सुरू होते. सायंकाळी साडे सहा वाजता कार्यालयातील वरच्या मजल्यावरील खोलीत शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत फर्निचर जळून खाक झाले आहे.

यामध्ये कोणतेही कागदपत्रे जळाली नसल्याचे उपायुक्त शिंदे यांनी सांगितले. दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

Web Title: Ahmednagar Food and Drug Administration office fire

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here