Home अहमदनगर अहमदनगर: दुचाकी कार अपघातात एकाचा मृत्यू, तर दोघे जखमी

अहमदनगर: दुचाकी कार अपघातात एकाचा मृत्यू, तर दोघे जखमी

Ahmednagar Accident: नान्नज शिवारातील लोकसेवा मंगल कार्यालयाजवळ दुचाकी व कारच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू.

One dead, two injured in two-wheeler car accident

जामखेड | Jamkhed: जामखेड तालुक्यातील नान्नज शिवारातील लोकसेवा मंगल कार्यालयाजवळ दुचाकी व कारच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे  गंभीर जखमी झाले आहेत.

नान्नज रोडवर झिक्री शिवारात मोटारसायकल व स्विफ्ट कारची  समोरासमोर झालेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर अवस्थेत असल्याने त्याला नगर येथील एका खाजगी हॉस्पिटलला हलविण्यात आले आहे

इंजमाम अहमद पठाण (२३, रा. नान्नज, ता. जामखेड) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. यातील मयत व जखमी तरुण आहेत. दुचाकीवर नान्नजकडून जामखेडकडे तर कार जामखेडकडून नान्नजकडे जात होती.

ही दोन्ही वाहने झिक्री शिवारातील लोकसेवा मंगल कार्यालयाजवळ आली जामखेड असता दोन्ही वाहनांची समोरासमोर येऊन जोरदार धडक झाल्याने दुचाकीवरील इंजमाम अहमद पठाण (२३) याचा मृत्यू झाला. सोहेल मस्जिद पठाण (२२) व मुदस्सिर मस्जिद पठाण (१८) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा पुढील तपास पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक बाळासाहेब तागड तपास करीत आहेत.

Web Title: One dead, two injured in two-wheeler car accident

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here