Home महाराष्ट्र पेट्रोल टाकून सासरा, पत्नी व मुलाला जाळले

पेट्रोल टाकून सासरा, पत्नी व मुलाला जाळले

Burnt with Petrol: जावयाने सासरा, पत्नी व मुलाला पेट्रोल टाकून जाळल्याची घटना.

father-in-law, wife and son were burnt with petrol

गोंदिया : सूर्याटोला येथे जावयाने सासरा, पत्नी व मुलाला पेट्रोल टाकून जाळल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. यामध्ये सासरा देवानंद मेश्राम (५२) यांचा मृत्यू झाला. पत्नी आरती किशोर शेंडे (३५, रा. भिवापूर, ता. तिरोडा) व मुलगा जय किशोर शेंडे (४, रा. भिवापूर, ता. तिरोडा) हे १० टक्के भाजल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. आरोपी किशोर श्रीराम शेंडे (रा. भिवापूर) हा फरार झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, पत्नीसोबत दररोज भांडण होत असल्याने आरोपी किशोर शेंडे तिला मारहाण करायचा. त्याला कंटाळून पत्नी आरती गेल्या वर्षभरापासून माहेरी सूर्याटोला येथे राहत होती. घटनेच्या दिवशी जेवण करून आरोपीचे सासरे देवानंद मेश्राम हे बाहेर, पत्नी व मुलगा आत झोपले असताना आरोपीने आधी सासऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावली. त्यानंतर आत झोपलेल्या पत्नी व मुलाच्या अंगावरही पेट्रोल टाकून आग लावून पसार झाला.

दरम्यान आरोपी किशोर शेंडे हा सोमवारी सूर्याटोला येथे आला होता. त्याने पत्नी व सासऱ्याशी भांडण करून धमकीही दिली होती.

Web Title: father-in-law, wife and son were burnt with petrol

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here