Home महाराष्ट्र विद्यार्थ्यांसाठी अपडेट: दहावी-बारावी परीक्षेबाबतचा ‘तो’ निर्णय रद्द

विद्यार्थ्यांसाठी अपडेट: दहावी-बारावी परीक्षेबाबतचा ‘तो’ निर्णय रद्द

HSC SSC board’s decision to issue question papers ten minutes before the exam is now canceled.

HSC SSC board's decision to issue question papers ten minutes before the exam is now canceled

मुंबई: १० वी आणि १२ वी बोर्डाच्या परीक्षा लवकरच सुरु होणार आहेत. १२ वीची २१ फेब्रुवारी आणि १० वी ची २ मार्च पासून परीक्षा सुरु होत आहे.  या पार्श्वभूमीवर बोर्डाकडून परीक्षांच्या योग्य संचलनाच्या दृष्टीने वेळोवेळी निर्णय आणि सूचना जारी केल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने  दहावी आणि बारावीची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. बोर्डाने परीक्षेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय आता रद्द केला आहे.

कोविड काळात विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका नीट वाचून घेता यावी तसेच, पेपर कसा सोडवायचा यासाठी विचार करण्यासाठी दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना दिली जायची. मात्र, आता बोर्डाने हा निर्णय रद्द केल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या गेल्या काही परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. त्यामुळे गैरप्रकार टाळण्यासाठी मंडळाने परीक्षेच्या दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे परीक्षेच्या कालावधीत प्रश्नपत्रिका हातात आल्यावर सुरुवातीच्या दहा मिनिटात प्रश्नपत्रिका वाचावी लागणार आहे.

दरम्यान दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दहा मिनिटाचा वेळ वाढवून द्या, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

Web Title: HSC SSC board’s decision to issue question papers ten minutes before the exam is now canceled

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here