Home नाशिक बाळूमामांच्या मेंढ्यांचा कळप चिरडल्या, १४ मेंढ्या अपघातात ठार

बाळूमामांच्या मेंढ्यांचा कळप चिरडल्या, १४ मेंढ्या अपघातात ठार

Sinnar: Balumama’s flock of sheep was crushed, and 14 sheep were killed in the accident.

Balumama's flock of sheep was crushed, 14 sheep were killed in the accident

नाशिक: सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पंचाळेजवळ शिंदेवाडी फाट्यावर बाळूमामांच्या पालखीतील मेंढ्यांच्या कळपाला कारने धडक दिल्याने १४ मेंढ्या जागीच मृत्युमुखी पडल्याची घटना रविवारी सकाळी उजेडात आली. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले.

बाळू मामांच्या पालखी क्रमांक १३ मध्ये समावेश असलेल्या २५० मेंढ्या पंचाळे येथे भाविकांच्या शेताकडे निघाल्या होत्या. पालखीचे आगमन झाल्यानंतर ग्रामस्थांनी . वाजत गाजत स्वागत केले. मेंढ्या रस्त्याने प्रवास करत असताना शिंदेवाडी फाट्यावर कारने मेंढ्यांच्या कळपाला धडक दिली. यामध्ये आठ मेंढ्या जागीच ठार झाल्या, तर सहा मेंढ्या जखमी झाल्या, काही वेळाने त्यांचाही मृत्यू झाला. ग्रामस्थ व भाविकांनी या घटनेच्या निषेधार्थ रस्ता काही वेळ रोखून धरला होता.

Web Title: Balumama’s flock of sheep was crushed, 14 sheep were killed in the accident

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here