Home महाराष्ट्र ब्रेकिंग: दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता

ब्रेकिंग: दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता

HSC SSC exams likely to be postponed

अमरावती : महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या (HSC SSC Exam) परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्यात अशा सूचना शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू  यांनी बैठकीत केल्या आहेत. मार्च महिन्यात होणाऱ्या 10 आणि 12 वी परीक्षा एक महिना पुढे ढकलावी, अशी सूचना राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिक्षण उपसंचालकांसोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत केली.

मागील दोन वर्षांच्या काळात शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास आणि लिखाणाचा सराव झालेला नसल्याने ही मागणी केली जात होती. मुलांचा लिखाणाचा सराव कमी असल्याने त्यांना परीक्षांना सामोरे जाण्यास अडचणी होऊ निर्माण होऊ शकतात. तसेच राज्यात सध्या शाळांबाबत ऑनलाइन-ऑफलाईनचा जो काही घोळ सुरू आहे त्यामुळे देखील विद्यार्थी संभ्रमात आहेत.

म्हणून मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्या अशा सूचना शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या बैठकीत केल्या. या ऑनलाईन बैठकीला शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: HSC SSC exams likely to be postponed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here