Home महाराष्ट्र माजी मुख्यमंत्र्याच्या नातीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ

माजी मुख्यमंत्र्याच्या नातीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ

Suicide former chief minister's grandson being found hanging

बंगरुळु: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांची नात सौंदर्या (वय ३०) हिने गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. बंगळुरू येथे ही घटना घडली. सौंदर्या पेशाने डॉक्टर होती.

सौंदर्या असे तीचे नाव असून ती बी. एस. येडियुरप्पा यांची पहिली मुलगी पद्मा यांची कन्या होती. तिच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक अहवालानुसार ती बेंगळुरू येथील तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आली. तिच्या मृत्यूचं गूढ अद्याप कायम आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ती पती आणि सहा महिन्यांच्या बाळासोबत राहात होती. सौंदर्याचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तिच्यासोबत काम करणारे एक डॉक्टरही राहात असल्याचे जनसत्ताने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. या प्रकरणात अद्याप कोणतीही सुसाईड नोट हाती आलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजे शुक्रवारी सकाळी सौंदर्या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. सर्व काही सुरळीत सुरू असताना सौंदर्याने आत्महत्या केल्याने येडियुरप्पा यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपल्या कॅबिनेट मंत्र्यांसह रुग्णालयात धाव घेतली.

Web Title: Suicide former chief minister’s grandson being found hanging

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here