Home अहमदनगर अहमदनगर: उसाला पाणी भरताना इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

अहमदनगर: उसाला पाणी भरताना इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

Kopargaon Dead body being found while filling water with sugarcane

Ahmednagar news Live | अहमदनगर | कोपरगाव: शेतकरी उसाला पाणी भरण्यास जात असताना उसाच्या कोपऱ्यात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने जेऊर कुंभार परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कोपरगाव (Kopargaon) तालुक्यातील जेऊर कुंभारी परिसरातील शेतकरी संदिप तुळशीराम शिंदे यांच्या उसाच्या शेतात 50 वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह ( Dead Body) आढळून आला आहे.

संदीप तुळशीराम शिंदे हे ऊसाला पाणी भरण्यास जात असतांना त्यांना उसाच्या कोपर्‍यात अज्ञातइसमाचा मृतदेह आढळून आला आहे. या इसमाचे वय 48 ते 50 वर्ष असावे असा अंदाज वर्तवला जात आहे. याबाबत संदीप शिंदे यांनी ही माहिती कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस नाईक ढाकणे करत आहेत.

Web Title: Kopargaon Dead body being found while filling water with sugarcane

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here