HSC SSC Result 2022: दहावी बारावीच्या निकालाचा मुहूर्त, शिक्षणमंत्र्यांकडून महत्वाची माहिती
मुंबई | HSC Result 2022 | SSC Result 2022 : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी हाती आली आहे. दहावी-बारावीचे निकाल यावर्षी वेळत लागण्याची शक्यता आहे. बारावीचा निकाल हा पुढच्या आठवड्यात लागेल. हा निकाल 6 किंवा 7 जूनला लागण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल हा जूनच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
दहावी आणि बारावीचे निकाल वेळेत लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. पुढील आठवड्यात 12 वीचा निकाल लागेल तर दहावीचा निकाल हा जूनच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला लागू शकेल. हा निकाल 6 किंवा 7 जूनला लागू शकेल. तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल लागणार”, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर होणार आहेत.
Web Title: HSC SSC Result 2022