Rape | अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार, नराधमास अटक
पुणे | Pune Crime: नात्यातील एका नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीला आपल्या घरी घेऊन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार (Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी अप्पासाहेब मोहन गाडे रा. पांढरे मळा हडपसर याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत माळवाडी येथील २७ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीचा नातेवाईक आहे. गाडे हा ३० मे रोजी फिर्यादीच्या घरी आला. त्यांच्या ९ वर्षाच्या मुलीला आपल्या घरी घेऊन जाऊन तिला जीवे मारण्याची धमकी आणि बळजबरीने तिच्याशी शारीरिक संबंध (Sex) प्रस्थापित केले. ही बाब तिच्या आईला समजली असता तिने पोलिसांत धाव घेतली. अधिक तपास पोलीस उप निरीक्षक पाटील हे करीत आहे.
Web Title: Rape Case Sexual abuse by abducting a minor girl