Home औरंगाबाद पुन्हा हादरले औरंगाबाद: पती पत्नीची निर्घुण हत्या, घरात आढळले मृतदेह – Murder

पुन्हा हादरले औरंगाबाद: पती पत्नीची निर्घुण हत्या, घरात आढळले मृतदेह – Murder

Husband and wife brutally murder, bodies found in the house

Aurangabad | औरंगाबाद: औरंगाबाद शहरात दोन दिवसांपूर्वी एकतर्फी प्रेमातून तरुणीची भोसकून हत्या (Murder) केल्याची घटना ताजी असताना दाम्पत्याची खून केल्याची घटना समोर आल्याने शहर हादरले आहे. शहरातील पुंडलिक नगर येथे आज सकाळी घरात दाम्पत्याचा कुजेलेल्या अवस्थेत मृतदेह (Dead Bodies) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

भांडे व्यापारी हिरालाल कलंत्री वय ५५ आणि किरण शामसुंदर कलंत्री वय ४५ अशी मयतांची नावे आहेत. घरात कुजलेले मृतदेह आढळून आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी कलंत्री यांच्या घराला कुलूप आहे. आणि घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती सविता सातपुते यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला असता पती पत्नीचे मृतदेह वेगवेगळ्या मजल्यावर पलंगाखाली लपवून ठेवल्याचे आढळून आले. मुलगा आकाश हा फरार असून फोन बंद येत आहे. तसेच मुलाने एसबी महाविद्यालयामध्ये शिकत असलेल्या बहिणीला शनिवारी नातेवाईक यांचा अपघात झाला आहे. आम्ही तिकडे जात आहे तु मावशी सविताकडे जा असे सांगितले. यानंतर मुलगी काकाकडे गेली. हि माहिती समोर आली आहे. या दृष्टीने पोलीस तपास सुरु आहे.

मोबाईल बंद लागत असल्यामुळे मुलगी घरी परतली होती मात्र दाराला कुलूप असल्याने मानलेल्या मावशीच्या घरी राहिली. आज सकाळी ती पुन्हा घरी आली तेव्हा दुर्घंधी येत होती. यामुळे ही घटना उघडकीस आली.    

Web Title: Husband and wife brutally murder, bodies found in the house

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here