Home अहमदनगर औद्योगिक वसाहतीत कंपनीत स्फोट होऊन भीषण आग- Fire

औद्योगिक वसाहतीत कंपनीत स्फोट होऊन भीषण आग- Fire

explosion at a company in an industrial estate caused a terrible fire

Ahmednagar | पारनेर । Parner:  सुपा औद्योगिक वसाहतीतील सुपर इन्फो या कंपनीत स्फोट होऊन भीषण  आग लागल्याची घटना घडली आहे. याआगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कंपनीचा कच्च्या माल जळून मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे .

याबाबत अधिक माहिती अशी की,  सोमवारी दुपारी ५ वाजेच्या दरम्यान सुपा औद्योगिक वसाहतीतील खराब टायर पासुन आँईल बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट भीषण आग लागली. यावेळी तेथे कामावर असलेले दहा कामगार प्रसंगावधान पाहून पळाल्यामुळे सुदैवाने बचावले. स्फोटानंतर आग इतक्या मोठ्या प्रमाणात होती की धुराचे लोट दहा-वीस किमी पर्यत दिसून येत होते.

माहिती समजताच सुपा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कामगार सुरक्षीत आहेत का याची खातर जमा केली. याबाबत सुपा पोलिस स्टेशनला उशीरापर्यत गुन्हा दाखल नव्हता .

Web Title: explosion at a company in an industrial estate caused a terrible fire

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here