Home अहमदनगर आधी पत्नीच्या डोक्यात फरशी, नंतर पोलीस ठाण्यात जात पोलिसावर व शिक्षकावर चाकूने...

आधी पत्नीच्या डोक्यात फरशी, नंतर पोलीस ठाण्यात जात पोलिसावर व शिक्षकावर चाकूने हल्ला

First the wife was stabbed in the head, then she went to the police station and attacked the police 

Rahata | राहता: राहाता तालुक्यातील चितळी येथे सासुरवाडीला आलेल्या कोल्हापूरच्या प्राध्यापकाने पत्नीच्या डोक्यात फरशी टाकून जबर जखमी करुन श्रीरामपूर तालुका स्टेशनमध्ये घुसून एका पोलिसावर व टाकळीभानच्या शिक्षकावर चाकूने वार (stabbed) करुन जबर जखमी केल्याची घटना घडली आहे.

राहाता तालुक्यातील चितळी येथे कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथे प्रोफेसर असलेल्या विनोद बर्डे (वय 40) याने काल दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्याची पत्नी शैला विनोद बर्डे ( वय 35) हिच्या डोक्यात पाटा मारुन जबर जखमी केले. त्यानंतर माझ्या सासुरवाडीघ्या लोकांनी मला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून अॅम्ब्युलन्स व पोलिसांना कळवून पोलीस ठाण्यात हजर झाला.

पोलीस ठाण्यात पासपोर्टच्या कामासाठी आलेल्या टाकळीभान येथील शिक्षक किशोर शिंदे यांच्या दोन्ही कानाच्या मागे, मानेवर तसेच मानेवर व पाठीवर असे चार ठिकाणी चाकुने वार करुन जबर जखमी केले. पोलीस काॅन्स्टेबल संतोष रामकिसन बर्डे यांच्या छातीवर वार करत असतांना त्यांनी तो वार आपल्या दंडावर वार झेलला. तो वार दंडात खोलवर असा गेल्याने जबर जखमी झाले.

शैला बर्डे, किशोर शिंदे, व पोलीस काॅ. संतोष बर्डे या जखमी तिघांवरही श्रीरामपूर येथील साखर कामगार हाॅस्पिटल येथे उपचार सुरु आहेत. यातील आराेपी विनोद बर्डे हा मानसिक आजाराने त्रस्त असून कोल्हापूर येथील शहा डाॅक्टरांकडे उपचार सुरु असल्याची माहिती त्याची आई श्रीमती बर्डे यांनी दिली.

Web Title: First the wife was stabbed in the head, then she went to the police station and attacked the police 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here