Home संगमनेर संगमनेर पंचायत समितीचा कनिष्ठ अभियंता १९ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला -Bribe

संगमनेर पंचायत समितीचा कनिष्ठ अभियंता १९ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला -Bribe

junior engineer of Sangamner Panchayat Samiti was caught red handed while accepting a bribe

Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पंचायत समितीमध्ये ठेकेदाराकडून कनिष्ठ अभियंता संजय गोविंदराव ढवण रा. श्रीरामपूर यांनी १९ हजाराची लाच (bribe) घेताना रंगेहाथ पकडल्याची घटना आज सोमवार दि. २३ मे २०२२ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.

नाशिक लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली आहे. संजय ढवण यांस ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची अधिक तपासणी सुरु आहे. याप्रकरणात आणखी एका अधिकाऱ्याचे नाव समोर येत असून खातरजमा करण्याचे काम सुरु आहे. याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

पोलीस अधीक्षक संजय कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली  नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चिंचोली गुरव येथे एका ठेकेदाराने काम घेतले होते. ठेकेदाराने कामास लागणारी सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती. त्याची परवानगी व कामाची पाहणी करण्यासाठी लाचखोर अभियंता संजय यांनी नेहमीच टाळाटाळ करीत परवानगी मिळविण्यासाठी १९ हजार रुपयांची मागणी केली. मात्र ठेकेदार म्हणाले सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे पैसे कशासाठी द्यायचे मात्र अभियंता संजय यांनी पैशाची मागणी केली. तक्रारदार कंटाळून थेट नाशिक लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांचे पथक संगमनेरात दाखल झाले. लाचलुचपत विभागाने पंचायत समितीत सापळा रचत तक्रारदाराकडून अभियंता संजय यांनी १९ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यांची सखोल चौकशी सुरु आहे.   

Web Title: junior engineer of Sangamner Panchayat Samiti was caught red handed while accepting a bribe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here