Ahmednagar News: पत्नीचा खून करुन पतीने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना, घरगुती कारणावरुन वाद.
अहमदनगर: पत्नीचा खून करुन पतीने आत्महत्या केल्याची घटना आगरकर मळ्यातील शिवनेरी चौक परिसरात समोर आली आहे. या घटनेमुळे नगर शहरात खळबळ उडाली आहे. उशिरापर्यंत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
आशा संदीप गुजर (वय 50 वर्ष) असे खून (Murder) केलेल्या पत्नीचे नाव असून संदीप रामचंद्र गुजर (वय 53 वर्ष, रा. आयकॉन पब्लिक स्कूल जवळ, शिवनेरी चौक, स्टेशन रोड, नगर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की रात्रीच्या वेळी जेवण करत असतांना नवरा बायको यांच्यात घरगुती कारणावरुन वाद झाला. वादानंतर संदीप गुजर याने बायको आशाच्या डोक्यात काहीतरी लोखंडी वस्तूने मारले. त्यामुळे आशाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर नवर्याने बायकोचा मृतदेह बाथरुमध्ये नेऊन ठेवला. दारुच्या नशेत असलेल्या संदीप याने किचनमध्ये जावून दोरीच्या सहाय्याने फाशी घेऊन आत्महत्या केली.
सकाळी शेजारी राहणार्या नागरिकांना आत्महत्या केल्याचा प्रकार खिडकीतून दिसला. स्थानिक नगरसेवकांना याची माहिती देण्यात आली. नगरसेवकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी घटनास्थळी धाव घेतली. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने तो दरवाजा तोडण्यात आला. घरातील किचनमध्ये संदीप गुजर याने आत्महत्या केल्याचे दिसून आले.
तसेच समोरच्या रुममध्ये रक्त सांडलेले दिसून आले. पोलिसांनी घराची झडती घेतली असता बाथरुममध्ये पत्नी आशा मृत अवस्थेत आढळून आली. दोन्ही मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असून पुढील तपास कोतवाली पोलिस करीत आहेत. या दाम्पत्याचे पश्चात तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.
Web Title: Husband commits suicide by killing his wife
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App