Home अहमदनगर अहमदनगर: लग्नात ओळख,  फ्रेन्ड रिक्वेस्ट अन् अत्याचार

अहमदनगर: लग्नात ओळख,  फ्रेन्ड रिक्वेस्ट अन् अत्याचार

Ahmednagar News:  १७ वर्षीय मुलीवर अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार.

Identity, friend request and abuse in marriage

अहमदनगर : शहरातील एका १७ वर्षीय मुलीवर अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत  पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून महेश गोवर्धन कराळे (वय २३ वर्षे, रा. अगडगाव, ता. नगर) याच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शहरापासून काही अंतरावर असलेल्या शाळेत शिकत असलेली १७ वर्षीय मुलगी गतवर्षी एका लग्नाला गेली होती. तिथे तिची ओळख महेश याच्याशी झाली. नंतर त्याने पीडितेला सोशल मीडियावरून रिक्वेस्ट पाठविली. ती पीडितीने स्वीकारली. तेव्हापासून त्यांच्यात सोशल मीडियावरून संभाषण सुरू होते. तो ऑगस्ट २०२२ मध्ये मुलीला भेटण्यासाठी तिच्या घराजवळ आला. लग्नाचे आमिष दाखवित तिला घेऊन घरी गेला. तिच्यावर बळजबरीने अत्याचार करत अश्लील फोटोही काढले. घरी सांगितल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. बदनामी होईल, या भीतीने पीडितेने घरी सांगितले नाही. त्यानंतर ६ नोव्हेंबर २०२३ रोजी तो पीडितेच्या शाळेत आला. घरी नेऊन तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. त्यावेळीही त्याने अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. अशाप्रकारे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तो पीडितेला वारंवार त्रास देऊ लागला. त्यानंतर २० नोव्हेंबर रोजी त्याने पीडितेला तिचे फोटो पाहण्यासाठी एका अज्ञातस्थळी बोलविले. पीडिता फोटो पाहण्यासाठी गेली असता तिथे तिला तिच्या मामाने पाहिले. तिने घडलेला सर्व प्रकार मामाला सांगितला. मामाने तिला घरी आणून सोडले. हा सर्व प्रकार मामाने पीडितेच्या आई- वडिलांना सांगितले. पीडितेच्या नातेवाईकांनी महेशचा शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Identity, friend request and abuse in marriage

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here