Home अहमदनगर अहमदनगर: हुक्का पार्लरवर आयजी पथकाचा छापा

अहमदनगर: हुक्का पार्लरवर आयजी पथकाचा छापा

Ahmednagar News:  हॉटेल एम. एच. 16 ब्राऊन लिफ येथे सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने छापा (Raid) टाकून कारवाई,  हॉटेल मालक, तीन कामगारांसह हुक्का ओढणार्‍या पाच जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

IG team raid hookah parlour Crime Filed

अहमदनगर: सर्जेपुरा भागातील हॉटेल एम. एच. 16 ब्राऊन लिफ येथे सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या पथकाने गुरूवारी (दि. 20) सायंकाळी छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान 11 हजार 200 रूपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

याप्रकरणी हॉटेल मालक, तीन कामगारांसह हुक्का ओढणार्‍या पाच जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अंमलदार शेख शकील अहमद यांनी फिर्याद दिली आहे.

सर्जेपुरा भागातील एका हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाला मिळाली होती. त्यांनी गुरूवारी सायंकाळी पंचासमक्ष संबंधीत ठिकाणी छापा टाकला असता पाच जण हुक्का ओढताना मिळून आले. हॉटेल मालक व दोन कामगार पसार झाले. वेटरला पथकाने पकडले. नऊ जणांविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉटेल मालक कृष्णा अशोक इंगळे (रा. नगर), वेटर प्रकाश धरम महातरा (मुळ रा. नेपाळ, सध्या रा. नगर), कामगार आमीन व प्रशांत (पूर्ण नावे माहिती नाही), हुक्का ओढणारे प्रदीप प्रशांत मेहता (वय 28 रा. झेडपी कॉलनी), अर्जुन लिंबराज पाडळे (वय 25 रा. इसळक, निंबळक ता. नगर), मोतीलाल प्रकाश भट (वय 24 रा. झेडपी कॉलनी, नगर), सौरभ राजेंद्र कनोजिया (वय 27 रा. गोविंदपुरा, भिंगार), अंकित कालिका मौर्य (वय 26 रा. नागापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

Web Title: IG team raid hookah parlor Crime Filed

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here