संगमनेर: जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा- Raid
Sangamner Crime: एका गाळ्यात चालणाऱ्या बिंगो जुगारावर घारगाव पोलिसांनी शुक्रवारी (दि.२१) सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास छापा (Raid) घालून एकावर गुन्हा.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील साकूर येथे तासकरवाडी रोडच्या कडेला एका गाळ्यात चालणाऱ्या बिंगो जुगारावर घारगाव पोलिसांनी छापा टाकला. शुक्रवारी (दि.२१) सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास हा छापा घातला. यावेळी एकावर गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी ५ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी सागर सत्यवान सूर्यवंशी (वय २० वर्षे, रा. कुंभार गल्ली, साकूर, ता. संगमनेर) याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तासकरवाडी रोडच्या कडेला एका गाळ्यात बिंगो नावाचा जुगार खेळत व खेळविला जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांना मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. पोलिस उपनिरीक्षक उमेश पतंगे, पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर, सुभाष नोदके यांनी छापा टाकला.
Web Title: Police raid on gambling den
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App