Home महाराष्ट्र गोदावरी नदीपात्रात दोन शालेय विद्यार्थी बुडाले

गोदावरी नदीपात्रात दोन शालेय विद्यार्थी बुडाले

गोदावरी नदीपात्रात दोन शालेय विद्यार्थी बुडाले

पुणतांबा: पुणतांबा जवळील बापतरा (वैजापूर) येथील दोन शालेय विद्यर्थी गोदावरी नदीत वाहून गेले असून ही घटना सोमवारी सकाळी सात वाजता बापतरा गोदावरी नदीकाठावर घडली . पथक शोध घेत असून आठ तासापर्यंत त्या मुलांना अद्याप शोध लागलेला नाही, त्यामुळे बापतरा गावातील ग्रामस्थ चिंताग्रस्त आहे.

You May Also LikeDeepika Padukone Ranveer Singh Marriage Date

 बापतरा येथील विवेक कालीचरण कुमावत (वय १४) तुषार सचिन गांगड (वय १४) व सार्थक एकनाथ भवार हे तिघे मित्र आंघोळीसाठी नदीकाठावर सकाळी सात वाजता गेले होते. विवेक कुमावत, तुषार गांगड हे दोघे नदीपात्रात आंघोळीसाठी उतरले. मात्र, त्या दोघांना नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते दोघे पाण्यात बुडाले. आपले दोन मित्र पाण्यात बुडाल्याचे सार्थक याने पाहिले. त्याने आरडाओरड केली, मात्र नदीवर सकाळी गर्दी नव्हती, सार्थकने दोघे मित्र पाण्यात बुडाल्याची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर ग्रामस्थानी नदीपात्राकडे धाव घेऊन विवेक व तुषारचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

 मुलांचा शोध अद्याप लागलेला नाही. मोहिम सुरु आहे बापतरा येथील दोन मुले नदीपात्रात बुडाल्याची माहिती नदीकाठावरील ग्रामस्थांना समजात येथील सरपंच मनिषा लक्ष्मण मुकिंद, पोलीस पाटील राजश्री नवनाथ गायकवा, लाखगंगाचे सरपंच दिगंबर तुरकणे, केशव मोरे, धनंजय गोर्डे, प्रभाकर गाडेकर, दत्ता धुमाह यांच्यासह ग्रामस्थ मुलांचा शोध घेण्यासाठी पथकाला मदत करीत असून जि.प.सदस्य पंकज ठोंबरे, जि.प.सदस्य प्रा.रमेश बोरणारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, राष्ट्रवादीचे अजय चिकटगावकर, शिवसेनेचे बाबासाहेब जगताप आदींनी बापतरा येथे येऊन घटनास्थळी भेट देऊन मदत कार्य केले.

 विवेक कुमावत, तुषार गांगड हे दोघेही जिवलग मित्र होते. इयत्ता आठवीत ते पुणतांबा येथील न्यु इंग्लिश‍ स्कूलमध्ये शिक्षण घेत होते. दोन विद्यार्थी बुडाल्याचे समजातच शाळा दिवसभर बंद ठेवण्यात आली.


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here