Home अहमदनगर Raid: शिर्डी देवस्थानाच्या या विश्वस्तांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी

Raid: शिर्डी देवस्थानाच्या या विश्वस्तांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी

Income tax Department Raid on Rahul Kanal home

शिर्डी: शिर्डी देवस्थानाचे विश्वस्त राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या घरी आयकर विभागाकडून (Income tax Department Raid) छापेमारी करण्यात आली आहे. त्यांच्या मुंबईतील घरी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे.

यावेळी केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यशवंत जाधव यांच्यापाठोपाठ शिवसेनेच्या दुसऱ्या नेत्याच्या घरी आयकर विभागानं धाडी टाकल्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय तसेच शिर्डी संस्थानाचे विश्वस्त राहुल कनाल हे सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहे. त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी छापेमारी सुरु आहे. आज आयकर विभागानं मुंबईत आणि पुण्यात छापेमारी सुरु केली आहे. आयकर विभागाचं एक पथक कनाल यांच्या वांद्रे येथील नाईन अल्मेडा इमारतीतील घरी आलं आणि त्यांनी झाडाझडती सुरू केली. यावेळी कनाल यांच्या इमारतीखाली सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला आहे. राहुल कनाल हे घरी आहेत की, नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही.सादर छापेमारी नेमक्या कोणत्या कारणासाठी केली गेली हे अद्याप समोर आलेले नाही.

Web Title: Income tax Department Raid on Rahul Kanal home

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here