Home क्राईम Theft: संगमनेर तालुक्यात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ, शेतकरी हैराण

Theft: संगमनेर तालुक्यात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ, शेतकरी हैराण

Sangamner Taluka Theft: लोखंडी ढाप्यांची चोरी; शेतकरी हैराण.

Increase in number of theft in Sangamner

घारगाव : संगमनेर तालुक्यातील मुळा नदीवर असलेल्या आंबी-खालसा या बंधाऱ्यामधील ५० हजार रुपये किमतीचे ५० ते १०० लोखंडी ढापे चोरीला गेल्याची घटना २२ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान घडली. चोरीचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. दोन महिन्यांपूर्वी जांबूत येथील बंधाऱ्याचे ४४ ढापे चोरीला गेले होते. आता पुन्हा ढापे चोरीला गेल्याने वाढत्या चोऱ्यांनी शेतकरी हैराण झाले आहेत.

आंबी-खालसा गावच्या हद्दीत मुळा नदीवर घारगाव – आंबी हा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा असून, या बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग घारगाव, आंबी खालसा, सराटी येथील शेतकऱ्यांच्या पिकांना होतो. आंबी-खालसा येथील शेतकरी बंधाऱ्याला ढापे टाकण्यासाठी गेले असता त्यांना ढापे आढळून आले नाही. त्यांनी सरपंच बाळासाहेब ढोले यांना सांगितले. बंधाऱ्याच्या जवळ असलेले ५० ते १०० लोखंडी ढापे चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. ढोले यांनी घारगाव पोलिसांना ढापे चोरीची माहिती कळवली. घारगाव पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार आर. व्ही. खेडकर यांनी पाहणी केली.

सरपंच ढोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस नाईक राजेंद्र लांघे हे करीत आहेत. फिर्यादीत दिलेल्या ढाप्यांची संख्या कमी असून, अधिक ढापे चोरीला गेले आहेत. त्यांची किंमतही लाखो रुपयांची असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

वाहनाची चोरी

बोटा (ता. संगमनेर) येथील रहिवाशी अंकुश राजू शेळके यांचे एमएच १२ जीएफ ६२४० या क्रमांकाचे घरासमोर उभे असलेले वाहन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याबाबत २६ ऑक्टोबर रोजी घारगाव पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

यापूर्वी घडल्या अनेक चोऱ्या 

घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वी चारचाकी, दुचाकी चोरी, दुकाने, घरफोड्या, विद्युत पंपांची चोरी, केबल चोरी अशा अनेक  चोऱ्या झालेल्या आहेत. मात्र, या चोयांचा शोध लावण्यात घारगाव पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घारगाव पोलिसांकडून तपासाची सविस्तर माहिती मागवून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Increase in number of theft in Sangamner

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here