Home अकोला Murder: शिवसेना ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख यांचा भोसकून खून

Murder: शिवसेना ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख यांचा भोसकून खून

Akola Murder Case:  अकोल्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख विशाल कपले यांच्यावर अज्ञात गुंडांनी प्राणघातक हल्ला करून हल्ल्यात विशाल कपले यांचा मृत्यू झाल्याची घटना.

Shiv Sena Thackeray faction's Deputy Mayor was stabbed to Murder

अकोला:  अकोल्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख विशाल कपले यांच्यावर अज्ञात गुंडांनी प्राणघातक हल्ला (Murder) करून हल्ल्यात विशाल कपले यांचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. अकोल्यातील जठारपेठ चौकातील गणेश स्वीट मार्टसमोर कपले यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये कपले गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान विशाल कपले यांचा मृत्यू झाला. कपले यांच्यावर हल्ला झाल्याचं समजताच शिवसैनिकांनी गर्दी केली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. दवाखान्यात शिवसैनिकांची गर्दी झाली आहे.

अकोल्यातील जठारपेठ चौकातील गणेश स्वीट मार्टसमोर संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणांपैकी एक असताना याचवेळी हा खून झाला आहे. दुचाकीवर आलेल्या दोन हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी विशालचा खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय.

विशाल यांनी काही दिवसांपूर्वी ते रहात असलेल्या उमरी परिसरातील अवैध धंद्यांसंदर्भात प्रशासनाकडे तक्रार केली होतीय. त्याची काही किनार त्यांच्या खुनाशी आहे का?, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, हल्लेखोरांचा शोध पोलिसांनी सुरू केला असून एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. दोन महिन्यांपूर्वी अकोल्यात शिवसेनेच्या शिंदे गटाचे उपशहरप्रमुख भागवत देशमुखांचीही वैयक्तिक वैमनस्यातून हत्या झाली होती. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Ttile: Shiv Sena Thackeray faction’s Deputy Mayor was stabbed to Murder

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here