महिलेने मंगळसुत्रासह दागिने मोडून १५ तोळ्यांचा सुवर्णहार बनवून साईबाबांना अर्पण
Shirdi Sai baba: स्त्रीधन (Gold) केले साईबाबाना अर्पण.
शिर्डी: साईबाबा दरबारी भक्त अनोखे दान करीत असतात. हैद्राबाद मधील एका महिला साईभक्तानं सोन्याचं अनोख दान बाबांना दिले आहे. पोलावर्नम कल्याणी या महिला भाविकाने आपल मंगळसूत्रातील सोन्यापासून सुवर्णहार करून बाबांना अर्पण केला आहे. वरिष्ठ आयएएस पतिच्या निधनानंतर स्त्रीधन बाबांच्या चरणी अर्पण करत सुवर्णहार स्वरुपात बाबांच्या चरणी दान दिला आहे. साईसंस्थानच्या मुख्यकार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी सुवर्ण हार स्विकारला असून मध्यान्ह आरती नंतर बाबांच्या मुर्तीला चढवण्यात आला आहे.
हैद्राबाद येथिल महिला भाविक पोलावर्मन कल्यानी यांनी आपले मंगळसूत्र आणि स्रीधन मोडून त्यातून साईबाबांसाठी आकर्षक सुवर्ण हार तयार केला. पोलावर्मन कल्याणी ह्या साईबाबांच्या निस्सिम भक्त आहेत. त्याचे पती वरिष्ठ आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत होते. पं बंगाल मध्ये अतिरिक्त चीफ सेक्रटरी या पदावर त्यांनी काम केले. सेवानिवृत्ती नंतर कोविडच्या लाटेत त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर आपण सोने अलंकार वापरणार नाही असा निश्चिय पी कल्याणी यांनी केला, आणि आपल्याकडील सर्व स्रीधन मोडून त्या सोन्यातून सुंदर आणि आकर्षक सुवर्ण हार तयार केला.
150 ग्रॅम वजनाचा अत्यंत सूबक कारागिरी केलेल्या हाराच्या निव्वळ सोन्याची किमंत सात लाख दहा हजार रुपये असून पी कल्याणी यांनी तो संस्थानकडे सपुर्द केला आहे. साईबाबाच्या मध्यान्ह आरती नंतर सुवर्णहार बाबांना घालण्यात आला.
साईंच्या दरबारी एक रुपयांपासून ते सव्वाशे कोटी रुपयांच दान बाबांच्या झोळीत टाकणारे भाविक येत असतात. साई समाधीचं दर्शन घेवून आपल्या इच्छाशक्ती नुसार बाबांना दान देतात. अलिकडच्या काळात बाबांना सोन्याच दान देणाऱ्या भाविकांची संख्या वाढताना दिसते.
Web Title: Mangalsutra and made a gold necklace worth 15 tolas and offered it to Sai Baba
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App