Home अहमदनगर रेखा जरे हत्याकांड: बाळ बोठेच्या पोलीस कोठडीत वाढ

रेखा जरे हत्याकांड: बाळ बोठेच्या पोलीस कोठडीत वाढ

Rekha Jare Murder Case Increase in police custody of Bal Bothe

अहमदनगर: रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे (Bal Bothe) यास हैदराबाद येथून अटक केल्यावर पारनेर न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

या कोठडीची मुदत संपल्यावर आज त्यास पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी तपास करण्यासाठी पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली त्यानुसार न्यायालयाने २३ मार्चपर्यंत कोठडीची वाढ केली आहे.

बाळ बोठेचा आयफोन अजून उघडलेला नाही हत्याकांडमागील कारण अजून समोर आले नाही. आरोपीला आठ दिवसांची अजून कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आली होती.

सरकारी पक्षाच्या वतीने वकील मनीषा दुबे हे युक्तिवाद करत आहे तर आरोपी पक्षाच्या वतीने वकील महेश नवले यांनी युक्तिवाद केला. आरोपी बाळ बोठे हा हत्याकांडनंतर फरार होता. त्याला १३ मार्च रोजी हैद्राबाद येथून अटक करण्यात आली.

Web Title: Rekha Jare Murder Case Increase in police custody of Bal Bothe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here