Home महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना करोनाची लागण

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना करोनाची लागण

Aditya Thackeray Corona Positive

मुंबई: राज्यामध्ये करोनाचा कहर वा वाढतच चालला आहे. त्यातच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांना करोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.

शिवसेनेतील अनेक मंत्र्यांना व नेत्यांना आत्तापर्यंत करोनाची लागण झाली असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यातच ठाकरे कुटुंबातील आदित्य ठाकरे यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये लिहिले आहे की, माझी कोविड चाचणी Covid १९ Test Positive आली असून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी. माझी सर्वाना विनंती आहे की कायम मास्क वापरा आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.

Web Title: Aditya Thackeray Corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here