Home क्राईम संगमनेर: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून प्रेयसी तरुणीची आत्महत्या

संगमनेर: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून प्रेयसी तरुणीची आत्महत्या

Sangamner Suicide of a young woman who is fed up with her boyfriend

संगमनेर | Sangamner: प्रेयसीचे प्रियकराने मोबाईलमध्ये फोटो काढून तिला पाहण्यासाठी आलेल्या पाहुण्यांना दाखविल्याने प्रियकराच्या त्रासाला कंटाळून प्रेयसीने गळफास घेत आपले जीवन संपविल्याची गुरुवारी संगमनेर खुर्द येथे घडली.

याप्रकरणी प्रियकराविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत तरुणीच्या वडिलांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, संगमनेर शिवारात राहत असलेल्या एका २० वर्षीय युवतीला श्रीराम राजा लोखंडे याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून प्रेमातूनच तिचे मोबाईलमध्ये फोटो काढले होते.

दरम्यान सदर युवतीला घरी पाहुणे पाहण्यासाठी आले. त्यादरम्यान श्रीराम याने प्रेयसीचे फोटो मित्राच्या मोबाईलवर पाठविले. तसेच तिला पाहण्यासाठी आलेल्या पाहुण्यांना ते फोटो दाखवून तिची बदनामी केली. याच त्रासाला कंटाळून या युवतीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महाले हे करीत आहे.

Web Title: Sangamner Suicide of a young woman who is fed up with her boyfriend

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here